जातपंचायतीविरुद्ध माझा लढा : माझ्या समाजासाठी सतत झटत राहावं, हीच माझी इच्छा आहे; नव्हे, ते माझं कर्तव्यच आहे, असं मी मानते.
पोलिओ असल्याने मी लहानपणी दुबळी होते. त्यामुळे आईला वाटत होतं की, हिला मुलं त्रास तर देणार नाहीत? पण ‘युवा’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की, “हिला घरी ठेवलंत तर ती अधिकच दुबळी होईल. शाळेत पाठवलंत तर उलट खंबीर होईल.” आणि तसंच झालं. शाळेत गेल्यावर माझ्यात खूपच आत्मविश्वास आला. अर्थात, मला माहीत नव्हतं ते! पण गोविंदीला जातपंचायत त्रास देऊ लागली, तेव्हा तो आत्मविश्वास माझ्यात आहे, हे मला जाणवलं.......